आता अलाहाबादला प्रयागराज म्हणायचे; नामकरणाला कॅबिनेटची मंजुरी

0
682

लखनऊ, दि. १६ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्याचे नाव आता प्रयागराज करण्याच्या प्रस्तावाला योगी आदीनाथ सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याची मागणी संत आणि स्थानिकांनी केली होती. 

उत्तर प्रदेशातील तीर्थराज प्रयागमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होणार आहे. हा कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने जोरदार तयार सुरू केली आहे. त्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. अलाहाबादचे नाव बदलण्यासाठी सरकारने ‘प्रयागराज मेळा प्राधिकरण’ ही बनवले आहे. ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात त्याला प्रयाग  असे म्हणतात.

१५८३ साली अकबर यांनी प्रयागमध्ये मोठे शहर बसवले होते. अल्लाचे शहर म्हणून त्याला ‘इल्लाहाबास’ असे नाव देण्यात आले होते. तेथे अलाहाबाद किल्ला होता. भारतात इंग्रज आल्यावर त्यांनी रोमन लिपीत  इलाहाबाद असे नाव दिले होते. त्यावेळेपासून हे शहर इलाहाबाद नावाने  प्रचलित झाले.