आतापर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ नागरिक स्थलांतरित

0
290

मुंबई, दि.1 (पीसीबी): सुमारे ९४ कोटींहून अधिक खर्च परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी (ता.२९) पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यासाठी सरकारने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून, आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये यावर खर्च करण्यात आला आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई – राज्यातून आतापर्यंत ८०० विशेष गाड्यांमधून साडे अकरा लाख परप्रांतीय त्यांच्या गावी गेले आहेत. राज्यातून परराज्यांत जाणारे अनेक मजूर परतीचा प्रवास रद्द करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी पुरवण्यात आलेल्या दीड हजार मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना ३१ मेपासून पुन्हा त्यांच्या जुन्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत ८०० रेल्वेतून ११ लाख ५० हजार परप्रांतीय आपापल्या गावी गेले आहेत. फक्त पश्‍चिम बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्या सध्या बाकी आहेत. तेथे वादळ आल्यामुळे या गाड्या प्रलंबित राहिल्या होत्या. पश्‍चिम बंगालमधील बहुसंख्य नागरिक रविवारी रवाना होतील, पण नव्या नोंदणीची संख्या घटली आहे. गुरुवारी ११ गाड्या विविध राज्यांत जाणार होत्या, पण अनेक कामगारांनी परतीचा प्रवास रद्द केल्यामुळे फक्त तीन गाड्या सोडण्यात आल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे १४२१ कर्मचारी पुन्हा जुन्या ठिकाणी रुजू होतील.
विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत ‘हे’ निर्देश…

सुमारे ९४ कोटींहून अधिक खर्च
परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी (ता.२९) पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यासाठी सरकारने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून, आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये यावर खर्च करण्यात आला आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.