Maharashtra

आतापर्यंत मनसेचे खळखट्ट्याक पाहिले… आता शांततेची ताकद दाखवू

By PCB Author

August 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर मनसेने आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आतापर्यंत मनसेचे खळखट्ट्याक पाहिले… आता शांततेची ताकद दाखवू, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

राज ठाकरेंना ईडीने २२ तारखेला साडे अकराच्या सुमारास बोलावले आहे. त्या दिवशी मनसेचे कार्यकर्ते शांततेत ईडी कार्यालयाबाहेर जमा होतील. मनसेच्या आंदोलनाचा कोणालाही त्रास होणार नाही. कामगार, व्यापारी किंवा कोणालाही त्रास न देता सर्व काही शांततेत होईल, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली. तसेच आम्हाला पूर्ण कल्पना आहे की कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कंट्रोल करु. पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांना मान्य असेलच, पोलिसांनीही आम्हाला सहकार्य करावे, असे नांदगावकर यावेळी म्हणाले.