आणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक – डॉ. प्रतिभा लोखंडे

0
519

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – आणीबाणीने सर्वसामान्य नागरीकांची मुस्काटदाबी केली. आणीबाणीचा तो काळ म्हणजे भारतीय लोकशाहीला बसलेला कलंक असल्याचे मत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आणीबाणी एक पर्व सन्मान सोहळ्याचे नुकतेच आयोजन केले होते. त्यामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी राज्य लेखा समिती अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश कार्यकारणी चिटणीस उमाताई खापरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वाणी, माजी नगरसेवक मधू जोशी, नगरसेवक सुरेश भोईर, नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, विजय सिनकर, रामकृष्ण राणे, मधुकर बच्चे, भारती विनोदे, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, शहर प्रसिद्धीप्रमुख संजीवनी पांडे, शेखर चिंचवडे, रवी देशपांडे, अलका पांडे, शिवाजी शेडगे, पंजाब मोंढे, राजेंद्र सराफ, दिलीप गडदे, लक्ष्मण प्रधान, भाजयुमोचे सचिन राऊत, स्वप्नील शेडगे, स्वप्नील डांगे आदी उपस्थित होते.

आसाराम कसबे यांच्या आणीबाणीवरील पोवाड्याने कार्यक्रमाला सुरवात झाली. वसंत वाणी, शरद खांबे, अॅड. सचिन पटवर्धन यांनी आणीबाणीतील काळ्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी यांनी केले. प्रदिप सायकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी धनंजय शाळिग्राम, अजित कुलथे, राहुल मोकाशी यांनी परिश्रम घेतले.