‘…आणि बुलेटची जोरदार धडक त्यांना बसली’

0
267

चाकण, दि. १२ (पीसीबी) – भरधाव वेगातील बुलेटने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 9) सायंकाळी नांदे रोड, म्हाळुंगे येथे घडली.

संजयकुमार शंभूनाथ साह (वय 35, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी मंगळवारी (दि. 11) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बुलेटस्वार (एमएच 12 / एक्‍स 9557) वरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजयकुमार यांच्या पत्नी नांदे रोड, म्हाळुंगे येथे रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या बुलेटने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी बुलेटस्वार घटनास्थळी न थांबता तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.