….आणि पुन्हा एकदा शीतल शिंदे यांना डावलले

0
912
पिंपरी, दि.०३ (पीसीबी) – स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपाचे निष्ठावान असलेले शीतल शिंदे यांनी आपल्याला स्थायी समिती अध्यक्षपद मिळेल अशी आशा होती यामुळे त्यांनी मिळणारे उपमहापौरपद नाकारले. परंतू दुसऱ्यांदा देखली स्थायी समिती अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्याने शीतल शिंदे यांना सत्ताधारी भाजपाने डावलले अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.
शीतल शिंदे भाजपाचे निष्ठावान आहेत. प्रभाग क्रमांक १९ मधुन ते दुसऱ्यांदा निवडुन आले आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिल्यावर्षी शिंदे यांची विधी समितीत निवड झाली होती. परंतू त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद हवे असल्यामुळे विधी समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्यात आला.
तिसऱ्या वर्षी शिंदे यांची पुन्हा स्थायी समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. परंतू यावेळी देखील त्यांना अध्यक्षपदासाठी डावलण्यात आल्यामुळे त्यांना सदस्यपदाचा राजीनामा दिला. महापौर व उपमहापौर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शीतल शिंदे यांना पक्षाने उपमहापौरपद देण्यात आले होते. परंतू त्यांनी हेही पद नाकारले. त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळेल अशी अपेक्षा होती. यावेळी पक्षाने शिंदे यांना शब्द दिला होता. पण यावेळी देखील शिंदे यांना डावलण्यात आले.
आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक असलेले संतोष लोंढे यांचा स्थायी समिती अध्यक्षपदासाठीचा अर्ज सोमवार (दि.०२) रोजी ऐनवेळी दाखल करण्यात आला. परंतू यावेळी संधी दिली नसली तरी शिंदे यांनी बंडखोरी केली नाही. शिंदे यांना भक्कम असा पाठिंबा नसल्यामुळे त्यांना डावलण्यात येत आहे का ? अशी चर्चा महानगरपालिका वर्तुळा सुरु आहे.
प्रदेशनेतृत्व आमदारांनी शीतल शिंदे यांना शब्द दिला होता. त्यांना अध्यक्षपदासाठी अर्ज भरायला देखील बोलावले होते. मात्र ऐनवेळी लांडगे समर्थक संतोष लोंढे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.