‘…आणि तेव्हाच ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातून गंठण हिसकावले’

0
445

निगडी, दि. २२ (पीसीबी) – पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेचे दोन चोरट्यांनी 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावले. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास बजाज ऑटो कंपनीच्या गेट समोर, आकुर्डी येथे घडली.

याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 21) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून निगडी ते पिंपरी या रस्त्याने जात होत्या. आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीच्या गेट समोर आल्यानंतर एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावले. फिर्यादी यांनी चोरट्यांना प्रतिकार केला असता त्यांच्या गळ्यातील गंठण तुटले. त्यातील 80 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचा भाग चोरटयांनी चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.