Pimpri

‘…आणि तिने आयुष्याची रेषाच ओलांडली’; ‘ती’चा अखेर मृत्यू

By PCB Author

January 11, 2021

तळेगाव दाभाडे, दि. ११ (पीसीबी) – भरधाव मिनी बसने पादचारी महिलेला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 9) सायंकाळी साडेसहा वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे घडली.

वसंत शंकर गुळवे (वय 57, रा. रुपीनगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या मिनी बस चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विष्णू लांडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुळवे मिनी बस (एम एच 12 / के क्यू 6555) जुना पुणे मुंबई महामार्गावरून भरधाव वेगात जात होता. तळेगाव दाभाडे येथे मयूर हॉटेल समोर एक महिला रस्ता ओलांडत असताना गुळवे याने त्याच्या बसने महिलेला जोरात धडक दिली. त्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.