Maharashtra

आज मुख्यमंत्री घेणार भाजप कार्यकाळातील विकासकामांचा आढावा

By PCB Author

January 30, 2020

बीड, दि.३० (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते आज नाशिकला जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे आज (ता.३०) दुपारी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदारांची आढावा बैठक घेतील.

या बैठकीत उपस्थितीत राष्ट्रीय पेयजल योजना, पंतप्रधान आवास योजना, सिंचन प्रकल्प, राष्ट्रीय आरोग्य प्रकल्प, जिल्हा परिषद रस्ते आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनांचा आढावा व प्रगतीची माहिती घेतील. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांच्या स्वतंत्र बैठका होतील. स्थगिती आणि प्रगतीची तपासणी करतील. त्यामुळे या योजनांचा पंचनामा करताना मुख्यमंत्रांकडून उत्तर महाराष्ट्राला काय ‘गिफ्ट’ मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.