Chinchwad

आजारपणाला कंटाळून चिखली पोलिस ठाण्यातील हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

October 17, 2018

वाकड, दि. १७ (पीसीबी) – आजारपणाला कंटाळून चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराने वाकड येथील पोलीस वसाहतीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.

चंद्रकांत टिळेकर (वय ४५, रा. बिल्डिंग क्र. ३२, कावेरीनगर, पोलीस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रकांत हे गंभीर आजाराने त्रस्त होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी वाकड येथील पोलीस वसाहतीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची नुकतीच निगडी पोलीस ठाण्यातून चिखली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.