आजपासून Amazon चा ‘फॅब फोन फेस्ट’, आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सवलत

0
331

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – जर नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही नक्कीच योग्य वेळ आहे. कारण, इ-कॉमर्स संकेतस्थळ  Amazon वर आजपासून ‘फॅब फोन फेस्ट’ या सेलला सुरूवात झाली आहे. या दरम्यान तुम्हाला अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट मिळणार आहे.

यामध्ये अॅपल आयफोन एक्स आणि वनप्लस 6 टी फोनचाही समावेश असणार आहे. वनप्लस ६ टी हा स्मार्टफोन या सेलमध्ये २७ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय सेलमध्ये रेडमी वाय३, रेडमी ७, सॅमसंग एम२० आणि सॅमसंग एम३० यांसारखे फोनही उपलब्ध आहे. आतापर्यंत हे फोन केवळ फ्लॅशसेलमध्येच उपलब्ध होते. आजपासून सुरू झालेला हा सेल तीन दिवसांनी म्हणजेच  १३ जून रोजी संपेल.  सॅमसंग गॅलेक्सी नोट ९, वीवो नेक्स, हुआवेई पी ३० प्रो आणि ओप्पो आर १७ हे स्मार्टफोनही या फेस्टमध्ये उपलब्ध आहेत. एक्सचेंज ऑफर आणि ‘नो कॉस्ट इएमआय’चीही सुविधा या सेलमध्ये आहे. अॅमेझॉनवर iPhone X, OnePlus 6T, Samsung Galaxy M30 आणि Xiaomi Redmi Y3 च्या खेरदीवर सर्वाधिक आकर्षक ऑफर देण्यात आली आहे.

जाणून घेऊया काही लोकप्रिय स्मार्टफोनवर किती ऑफर –

-वनप्लस 6T च्या 8GB + 128GB व्हेरिअंट ४१ हजार ९९९ रुपयात लाँच केला होता. हा फोन या फेस्टमध्ये २७ हजार ९९९ रुपयात मिळणार आहे.

-६ हजार ५०० रुपयांच्या सवलतीसह शाओमीचा एमआय ए2 हा स्मार्टफोन १०,९९९ रूपयांना उपलब्ध असेल.

-Apple चा आयफोन एक्स आर (64 जीबी स्टोरेज मॉडेल) ५९ हजार ९९९ तर १२८ जीबी स्टोरेज मॉडेल ६४ हजार ९९९ रूपयांना उपलब्ध असेल.

-सॅमसंग गॅलेक्सी एम 20 फोन १० हजार ९९० रुपयात लाँच केला होता. हा फोन आता ९ हजार ९९० रुपयात उपलब्ध आहे.

-सॅमसंगचा  एम 30 हा स्मार्टफोन पंधराशे रुपयांच्या डिस्काउंटसह १४ हजार ९९० रुपयांमध्ये मिळेल.