Desh

आघाडीस नकार देणाऱ्या काँग्रेसवर अरविंद केजरीवालांचा मोठा आरोप

By PCB Author

March 05, 2019

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी होणार नाही, अशी घोषणा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी आज (मंगळवार) केली. त्यानंतर   मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर  निशाणा साधला आहे. काँग्रेसने भाजपसोबत छुपी आघाडी केली आहे,  असा आरोप केजरीवाल यांनी केला. 

भाजपविरोधी मतांची विभागणी करून काँग्रेस भाजपला मदत करत आहे. काँग्रेसने भाजपसोबत छुपी आघाडी केल्याच्या अफवा आहेत. दिल्लीत भाजप-काँग्रेस युतीशी लढण्यास तयार आहे, अशा अनैतिक युतीचा जनता पराभव करेल, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

आज दुपारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपबरोबर युती करण्यासंदर्भात दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि शीला दीक्षित या बैठकीस हजर होत्या.  यावेळी काँग्रेस नेत्यांची  मते जाणून घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी  आपशी आघाडी करण्याचा निर्णय रद्द करून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.