Maharashtra

आघाडीबाबत मनसेकडून कोणताच प्रस्ताव नाही – बाळासाहेब थोरात  

By PCB Author

September 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याची मागणी केली जात आहे. परंतु आघाडीबाबत मनसेकडून कोणताच प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात  एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये  सांगितले.

मनसे आघाडीत येण्याची शक्यता नाही, आघाडीत येण्यासंदर्भात राज ठाकरे यांच्याकडून  किंवा आमच्याकडूनही काही प्रस्ताव दिला नाही. किंबहुना, मनसेच्या संदर्भात अजून तशी काही चर्चाच झाली नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आमची भूमिका आहे, परंतु राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, अशी मागणी वंचितने केली आहे, हे शक्य नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे भाजप-शिवसेनेचा फायदा, हे लोकांना कळाले आहे. असेही थोरात यांनी सांगितले.