आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलातील जवानाचा सिलेंडरच्या स्फोटात मृत्यू

0
899

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथे एका चायनीजच्या हॉटेलात लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलातील जवानाचा सिलेंडरच्या स्फोटात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२८)  मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

जगन आंबवले असे मृत अग्निशमन दलातील जवानाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथे एका चायनीजच्या हॉटेलात लागली होती. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आग विझवताना सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये अग्निशमन दलातील जगन आंबवले यांचा मृत्यू झाला तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे. सिलेंडरचा स्फोट नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत असून जगन आंबवले यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाला आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.