Maharashtra

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही – काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त

By PCB Author

January 07, 2019

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून कळवले आहे.  प्रिया यांनी या पत्रात मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे.  

काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीमुळे प्रिया दत्त या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.  २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतर प्रिया यांनी काँग्रेस स्वत:च्या आजाराने ग्रस्त  असल्याचे म्हटले होते.  लोकसभा निवडणुकीतील  काँग्रेसच्या पराभवाला त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर  खापर फोडले होते. राहुल यांच्याकडे निवडणुकांचा अनुभव कमी असल्याची टीका त्यांनी  केली होती.

दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाने सप्टेंबर २०१८ मध्ये प्रिया दत्त यांना सचिव पदावरून मुक्त केले होते. प्रिया दत्त यांच्या नकारामुळे काँग्रेस मुंबईतील उत्तर-मध्ये मतदारसंघातून एखाद्य चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून नगमा, राज बब्बर किंवा इतर चित्रपट कलाकाराला संधी मिळण्याची शक्यता आहे.