आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही – अभिनेते रजनीकांत

0
428

चेन्नई, दि. १७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, तसेच रजनी मक्कल मंदारमचाही निवडणुकीत सहभाग नसेल, अशी घोषणा प्रसिध्द अभिनेते रजनीकांत यांनी  प्रसिद्धीपत्रक काढून  केली आहे.

आगामी निवडणुकीत माझा किंवा माझ्या पक्षाचा कोणालाही पाठिंबा नसेल. चाहते आणि कार्यतर्त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचे चिन्हं, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर हा इतर पक्षाच्या प्रचारासाठी  करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा ऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचे लक्ष असेल असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.  या निर्णयामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये नाराज पसरली आहे. दरम्यान, रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी ‘रजनी मक्कल मन्दरम’नावाचा पक्ष काढला होता.