आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे – अमर्त्य सेन

0
707

कोलकता, दि. २७ (पीसीबी) –  भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे आगामी  लोकसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष आणि भाजपेत्तर पक्षांनी एकत्र यायला हवे, असे मत व्यक्त करून  ‘कुहेतून पछाडलेला पक्ष गेल्या निवडणुकीत विजयी झाला’, अशी टीका  नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केली.

एका कार्यक्रमात सेन बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,  पश्चिम बंगालमधील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी भाजपच पर्याय असल्याची चर्चा  सुरू आहे, मात्र, ‘हे अजब तर्कट आहे. हुकूमशाही संपवण्यासाठी आपण धार्मिकतेचे बीज पेरायचे का?  सध्या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. पण आपण परिस्थितीत सुधारणा करू शकतो. आपल्यावर प्रहार होतील, तरीही जनताच ही स्थिती बदलू शकते. बुडणारी बोट सोडून पळ काढणे हा उपाय नव्हे’, असेही सेन म्हणाले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत ३१ टक्के मते मिळालेल्या पक्षाने ५५ टक्के जागा जिंकल्या. कुहेतूने पछाडलेल्या पक्षाने सत्ता मिळवली. बहुपक्षीय पद्धत लोकशाहीसाठी योग्य नाही, हे सिद्ध करणारे एकही उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. एकपक्षीय पद्धतच लोकशाहीसाठी मारक आहे. इतिहासात अशा हुकूमशाही पद्धतीची अनेक उदाहरणे दिसतील, असे ते म्हणाले.