आगामी लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान घ्या; १७ पक्षांची मागणी  

0
577

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – भारतात २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान पत्रिकांद्वारे मतदार घेण्यात यावे, अशी मागणी देशातील १७ राजकीय पक्षांनी केली आहे.  सध्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनमधील (ईव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे पारदर्शक आणि निष्पपातीपणे निवडणुका होण्यासाठी मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात यावे, अशी   मागणी या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिकेवरच मतदान घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केली आहे.

तर समाजवादी पक्षाने यापूर्वी अनेक वेळा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांदरम्यान इव्हीएममध्ये छेडछेड होत असल्याचा आरोप विरोधकांनी  केला आहे. याबाबत चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. मात्र, निवडणुक आयोगानेही इव्हीएम मशीनमध्ये कोणतीही छेडछाड होत नसल्याचा दावा करून विरोधकांची मागणी फेटाळून  लावली होती.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बसप आणि सप या पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप करून निवडणूक प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली  होती. पंजाबमधील निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही ईव्हीएममधील फेरफेराचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.