आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

0
460

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या कऱण्यात आल्या आहेत. या बाबतचा आदेश सोमवारी (दि.१९) काढण्यात आला.

कोणत्याही प्रकारच्या निवडणुकां दरम्यान पोलिसांच्या बदल्या होणे हे रुटींग आहे. निवडुकी दरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नियोजन करुन पोलिसांच्या बदल्या योग्य ठिकाणी करण्यात येतात. यादरम्यान बऱ्याचदा राजकीय नेते हस्ताक्षेप करुन आपल्या सोईनुसार पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन घेतात. तर काही पोलीस एकाच ठिकाणी बसतान मांडून असतात. यामुळे कोणत्याही निवडुकी पूर्वी पोलिसांच्या बदल्या केल्या जातात. दरम्यान काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालयात या आगोदरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने काही पोलीस कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. तर काहींनी खाजगीमध्ये निराशा व्यक्त केली आहे.

बदली झालेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक भानुदास जाधव (वपोनि तळेगाव दाभाडे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२), सुधाकर काटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे), अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी ते पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा), राजेंद्र पांडूरंग कुंटे (वपोनि भोसरी एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष संलग्न), भीमराव एन. शिंगाडे (पोलीस निरीक्षक विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी अतिरिक्त कार्यभार), विवेक व्ही. मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली ते पोलीस निरीक्षक सायबर सेल), श्रीराम बळीराम पोळ (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली अतिरिक्त पदभार), शंकर वामनराव अवताडे (पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड), सतिश पवार (पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी), आर.पी. चौधर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ते पोलीस नियंत्रण कक्ष संलग्न), उमेश औदुंबर तावसकर (पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा ते वाहतुक नियंत्रण कक्ष), सतिश विठ्ठलराव नादुरकर (पोलीस निरीक्षक गुन्हे भोसरी एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार) यांचा समावेश असून १३ सहायक पोलीस निरीक्षक तर ५० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.