आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपचा ‘हा’ फार्म्युला वापरणार

0
1925

मुंबई , दि. ५ (पीसीबी) – दिल्ली ते गल्लीपर्यंत  निवडणुका जिंकण्यासाठी  भाजपची एक विशेष  रणनीती  आहे. भाजपने देशभर ‘वन बूथ ट्वेंटी यूथ’ धोरण राबवून संघटनात्मक बांधणी व प्रचार यंत्रणा सक्षम  केली आहे.  त्याचे रिझल्ट चांगले आले आहेत. आता त्याप्रमाणे शिवसेनेनेही आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत ऊहापोह केला.  

यावेळी ठाकरे यांनी युती करण्याच्या पर्यायाची  चाचपणी करत स्वबळावर निवडणुका लढवण्यास सज्ज राहण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी  पदाधिकाऱ्यांना दिल्या.  त्यासाठी भाजपचा पॅटर्न राबवून भाजपला शह देण्याची  खेळी ठाकरेंनी  केल्याचे समजते.  या बैठकीत बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख नेमण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासाठी कार्यकर्ते तातडीने नियुक्त करण्यात यावे. तसेच  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्ष कसा पोहोचेल याकडे लक्ष द्यावे, असे  उद्धव ठाकरे यांनी सांगितले.