Desh

आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहवर ७२ तासांची प्रचारबंदी

By PCB Author

May 02, 2019

नवी दिल्ली,  दि. २ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरवर  ७२ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे.  निवडणूक आयोगाने आक्षेपार्ह विधानाची गंभीर दखल घेत ही कारवाई केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या व सध्या जामिनावर असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग  यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे.  साध्वी यांनी हिंदुत्व हा   प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला आहे.  प्रचार सभेत ती वादग्रस्त  विधान करत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह  विधान केले होते. करकरे हे माझ्या शापामुळेच  शहीद झाले, असे वादग्रस्त विधान साध्वींने केले होते.

बाबरी पाडली, आता राम मंदिर बांधणार, असेही साध्वी म्हणाली होती. या विधानाप्रकरणी तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत साध्वीवर कारवाई केली आहे.