आकुर्डी मंडई सुरू करायला परवानगी द्या – विक्रेत्यांची अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी

0
341

आकुर्ङी, दि. २ (पीसीबी) – आकुर्डी भाजी मंङई चालू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी खंडेराय भाजी मंडई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी स्वीकृत नगरसदस्य सुनिल कदम , भाजी मंङईचे अध्यक्ष माणिकराव सुरसे, पोपट काळभोर, मंगेश काळभोर उपस्थित होते.

निवेदन देण्यापूर्वी सर्व १०४ गाळेधारकांची बैठक झाली. त्यात प्रत्येक ग्राहकाला मंडईत प्रवेश देण्यापुर्वी त्याचे तामपान तपासणे तसेच मास्क लावलेला आहे याची खात्री करून घेण्याची जबाबदारी संघटनेने घेतली. मंडई परिसराचे तसेच येणाऱ्या ग्राहकांनाही सॅनिटायझेशनचे बंधन करू अशी ग्वाही संघटनेने निवेदानात दिली. १०४ पैकी निम्मे गाळेच सुरू राहतील, सोशल डिस्टंन्सिंग पाळू असेही विक्रेत्यांनी सांगतिले.

मंडई परिसरात हातगाडीवर भाजी विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आकुर्डी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून हे विक्रेते बसलेले असतात. त्यांच्यामुळे धोका संभवतो. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नाही. महापालिकेने त्याची तत्काळ दखल घ्यावी आणि अधिकृत मंडई सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.