आकुर्डीत गॅरेजच्या गल्ल्यातील रोख ७० हजार चोरट्यांनी पळवले

0
564

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – बंद गॅरेजच्या खिडकीतून प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी  गॅरेजमधील गल्ल्यात ठेवलेले रोख ७० हजार रुपये चोरून नेले. ही घटना आकुर्डी येथील विठ्ठलवाडी परिसरात घडली.

याप्रकरणी अनिल आनंदा जाधव (वय ३८, रा. जाधववाडी, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचे आकुर्डीतील विठ्ठलवाडी येथे गॅरेज आहे. शुक्रवारी (दि.१४) रात्री आठच्या सुमारास त्यांनी गॅरेज बंद केले. मात्र  रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांनी गॅरेजच्या खिडकीतुन प्रवेश करत गॅरेजच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले रोख ७०  हजार रुपये चोरून नेले. शनिवारी (दि.१५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जाधव यांनी गॅरेज उघडले. त्यावेळी गल्ल्यात ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.