आकुर्डीत कटर, ब्लेडने हल्ला करुन रेल्वे स्थानकावर लुटमार करणाऱ्या १३ जणांसह दोन लिडर अटक

0
911

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – कटर, ब्लेडने वार करुन तसेच मिरडी पुड, बामचा वापर करुन रेल्वेमध्ये आणि रेल्वे स्थानकारवर नागरिकांची लुटमार करणाऱ्या १३ चोरट्यांना त्यांच्या दोन लिडरसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्र स्वयंसेवकांनी पोलिसांच्या सहाय्याने केली. या पोलिस मित्र संघटनेने विशेष मोहिम राबवून ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी, स्टेशन मास्टर तसेच पॉईंट्समन लुटींच्या वाढत्या गुन्हेगारीच्या नागरिक त्रस्त झाले होते. रात्रीच्या वेळेमध्ये लुटींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या करिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्र स्वयंसेवकांनी ‘ऑपरेशन कटर गँग’ ही  धडक मोहीम राबवली. ही मोहीम सलग सहा दिवस राबविण्यात आली.  यामध्ये त्यांनी १३ पाकीटमारांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

तसेच मंगळवारी (दि.४)  पाकीटमारांचे लिडर पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी पोलिस मित्रांनी ब्लेड, कटर वस्तरा, मिरची पुड व बामाच्या बाटलीसह चोरट्यांच्या दोन लिडरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, अमोल कानू, विशाल शेवाळे, तेजस सापरिया, अमित डांगे, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, जयेंद्र मकवाना, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, रेखा भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे यांनी केली. यावेळी सहाय्यक रेल्वे पोलीस उप निरीक्षक पुरुषोत्तम करदाळे रेल्वे अधिकारी राजेश कुमार, राजपाल गजभिये, दत्ता खाडे आणि परिसरातील नागरिकांनी समितीचे कौतूक केले.