आकुर्डीतील डी.वाय.पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये वॉटर ऑलिंपियाड २०१९ चे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन यांच्या हस्ते उद्घाटन

0
490

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – रोटरी क्लब सिंहगड रोड, जाणीव युवा फाउंडेशन पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर ओलिंपियाड २०१९ या उपक्रमाचे उद्घाटन आकुर्डीतील डॉ. डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २८) करण्यात आले.

यावेळी ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक डॉ. फिलीप बेल, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, डॉ. श्रीकांत पाटणकर, सतीश खाडे, विराग मधुमालती वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वढई व स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ अशोक मोरे आदी उपस्थित होते.

डॉ. प्रभात रंजन यांनी इंडिया विजन २०३५ च्या अनुशंगाने पाण्याचे महत्व विशद केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य विजय वढई यांनी उपस्थितांचे स्वागत केले व डॉ पाटणकर व मा खाडे यांनी वॉटर ओलंपियाडची माहिती देऊन  स्पर्धेची रूपरेषा सादर केली.  डॉ. फिलीप बेल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता पाटसकर यांनी केले तर डॉ अशोक मोरे यांनी आभार मानले.