Pimpri

आकुर्डीतील अनधिकृत ११ पत्राशेडवर महापालिकेची कारवाई

By PCB Author

July 30, 2019

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – आकुर्डीतील प्रभाग क्रमांक १४ मधील ११ दुकानासमोरील अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली.

ही कारवाई शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता नरेश रोहिला, ३ कनिष्ठ अभियंता, ४ बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली.

या कारवाईसाठी पोलीस, अग्निशामक दल, रूग्णवाहिका, डंपर, ट्रॅक्टर, ठेकेदार मजूर यांची मदत घेण्यात आली.