Pimpri

आईस्क्रीम कंपनी ची फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने तरुणाची पावणे तीन लाखांची फसवणूक

By PCB Author

April 17, 2024

आईस्क्रीम कंपनी ची फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्ब्ल पावणे तीन लाखांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 20 मार्च 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली आहे.

याप्रकरणी तेजस रविकांत देशपांडे (वय 25 रा.पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.. पोलिसांनी निलेस अशोक चव्हाण व अशोक चव्हाण ( दोघे रा.सिंहगड रोड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मेरिडियन आईस्क्रीम फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून 2 लाख 85 हजार रुपये घेतले. व्यवसाय सुरु करण्यास सांगितले मात्र अद्यापही फ्रांचायसी व कोणतेही करार पत्र न देता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.