Chinchwad

आईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून रहाटणीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

December 15, 2018

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – दोघा मित्रांनी आईविषयी अपशब्द काढल्याच्या कारणावरून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१०) रहाटणी येथे घडली.

वैभव गजानन काळे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नांव आहे. या प्रकरणी तरूणाची आई अर्चना काळे (वय ३७, बळीराजा कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे (रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे हे दोघे वैभव काळे याचे मित्र आहेत. दोन्ही आरोपी यांनी वैभव याच्या आईबद्दल अपशब्द काढले. ते अवमानकारक  वाटल्याने वैभव यांने सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास  राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.