Pune

आईला कारागृहातून सोडवण्यासाठी पैसे देतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By PCB Author

September 17, 2019

पुणे, दि. १७ (पीसीबी) – आईला कारागृहातून जामिनावर सोडवण्यासाठी पैसे देतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपीस अटक करण्यात आली.

पृथ्वीराज राजेश म्हस्के (अप्पर इंदिरानगर)  अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईला एका गुन्ह्याप्रकरणी येरवडा कारागृहात मार्च २०१९ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान शिक्षा झाली होती. त्या काळात आईला कारागृहातून सोडविण्यासाठी वकिलाची फी देण्यासाठी मैत्रिणीकडे पैसे मागितले. तेव्हा मैत्रिणीने अप्पर इंदिरानगर परिसरात राहणार्‍या पृथ्वीराज राजेश म्हस्के याचा फोन नंबर दिला. तो तुला पैशांची मदत करेल असे तिने सांगितले. त्यानंतर तिने पैशांसाठी त्याला फोन केला. त्या पीडित मुलीस कात्रज येथील एसआरए वसाहती जवळ आरोपीने बोलवले. त्यानंतर तेथील एका इमारतीमध्ये आरोपी तिला घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. हा प्रकार पीडित मुलीने त्यावेळी घरात कोणालाही सांगितला. काही दिवसांनी पीडित मुलीची आई शिक्षा भोगून आल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर पीडित मुलीची रुग्णालयात तपासणी केली असता. ती २४ आठवड्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व प्रकारानंतर आरोपी पृथ्वीराज राजेश म्हस्के याच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.