Lifestyle

आंबट-गोड चिंच खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

By PCB Author

September 26, 2020

चिंच म्हंटल कि तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. चवीला आंबट-गोड असणारी चिंच साऱ्यांनाच आवडते. एखादा रोजच्या जेवणातील पदार्थ असो किंवा फास्टफूड अनेक पदार्थांमध्ये चिंचेचा वापर केला जातो. परंतु, चिंच केवळ पदार्थाची चव वाढविण्यापूरतीच मर्यादित नसून तिचे अन्यही काही गुणधर्म आहेत. चिंचेचा उपयोग हा एखाद्या पदार्थाची चव वाढविण्यासाठी केला जातोच त्यामुळे स्वयंपाक घरात चिंचेचे एक वेगळे स्थान आहे. विशेष म्हणजे चिंच खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात येते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला चिंचेचे गुणकारी फायदे माहिती असायला हवेत…

१. चिंचेमधील हायड्रॉक्सायक्ट्रिक अॅसिड या घटकामुळे शरिरातील फॅटस वाढण्याचे प्रमाण नकळत कमी          होते. तसेच शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या एन्झामाईनचे प्रमाणही चिंचेमुळे कमी होते.

२. अनेक जण पचनक्रिया होत नसल्याची तक्रार करत असतात. अशा व्यक्तींनी आहारात चिंचेचा वापर           करावा. चिंच खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

३. चिंचेच्या रसामध्ये बद्धकोष्ठता दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या विविध तक्रारींवर     चिंचेचा रस औषध म्हणून वापरला जातो.

४.चिंच ही आंबट असल्याने त्यामध्ये व्हीटॅमिन सी असते. घशात होणाऱ्या वेदना कमी करण्यास चिंचेचा           उपयोग होतो.

५. स्वयंपाकघराशिवाय तिचा उपयोग इतर गोष्टींसाठी सुद्धा होतो. पितळेची, तांब्याची भांडी हि चिंच आणि        मिठाने चोळल्याने भांड्याना चकाकी येते.