Desh

आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत बोट उलटून ११ जणांना जलसमाधी  

By PCB Author

September 15, 2019

हैदराबाद, दि. १५ (पीसीबी) – आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपटनम येथे आज दुपारी ( रविवारी) गोदावरी नदीत  पर्यटक बोट उलटून ११ जणांचा मृत्यू झाला. या बोटीत  ६१ जण होते.  त्यापैकी   अनेकजण बुडाले असल्याने मृतांचा आकडा  वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जणांना वाचवण्यात यश आलेले आहे.  घटनास्थळी ३० जवानांची एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली आहेत.  बुडालेल्या पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.  मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटूंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

ही दुर्घटना नेमकी  कशी घडली,  याबाबत माहिती घेतली जात आहे.  आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्यवतीने चालवल्या जात असलेल्या या बोटीत ६१ जण होते.  ज्यामध्ये ११ चालक सदस्यांचाही समावेश होता. ही बोट कच्चुलुरूजवळ उलटली, असे गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अदनान अस्मी यांनी सांगितले.