आंध्रात आमदाराने घेतली मुख्यमंत्र्याच्या नावाने शपथ

0
362

हैदराबाद, दि. १३ (पीसीबी) – नेत्याची मर्जी राखण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरचा घाम स्वत:च्या रूमालाने पुसणे, चपला उचलणे, नेत्याची देवळे बांधणे असे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. आंध्रातील एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीने या सर्वांवर कडी केली आहे. या महाशयांनी थेट मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने आमदारकीची शपथ घेण्याचा पराक्रम केला आहे. आंध्रातील या प्रकारामुळे राजकारणातील ‘होयबा’ संस्कृतीची जोरदार चर्चा देशात रंगली आहे.

श्रीधर रेड्डी असे या आमदार महाशयांचे नाव असून ते नेल्लोर मतदारसंघातून वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आंध्र विधानसभेतील नव्या सदस्यांनी बुधवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वसाधारणपणे नवनिर्वाचित आमदार किंवा नवनियुक्त मंत्री ईश्वर, राज्यघटना किंवा विवेकबुद्धीला स्मरून शपथ घेतात. मात्र, श्रीधर रेड्डी यांनी शपथ घेताना मुख्यमंत्री जगनमोहन यांचे नाव घेतले. त्यांचे हे बोल कानी पडताच सगळेच बुचकळ्यात पडले. विधानसभा अध्यक्ष संबांगी अप्पाला नायडू यांनी रेड्डी यांना लगेचच रोखले आणि पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली.