‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना  

0
1703

अयोध्या, दि. २३ (पीसीबी) – आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’ असे त्यांच्या पक्षाचे नांव आहे. पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी लगेच पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. अयोध्या दौऱ्यावर आलेल्या तोगडिया यांनी आज (मंगळवार) पक्षाची घोषणा केली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे  कार्यकर्ते उपस्थित  होते.

आगामी लोकसभा निवडणूक आपला पक्ष लढवणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.  तसेच आपल्या पक्षाचे सरकार आल्यास तीन महिन्यांत राम मंदिराची उभारणी करणार, अशी त्यांनी घोषणा केली.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सर्व जागावर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहे. तसेच आपले सरकार आल्यास अल्पसंख्याकांची लोकसंख्या नियंत्रणात  आणण्यासाठी कायदा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी नव्या राजकीय पक्षात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी हिंदू संघटनांना केले.