Maharashtra

आंघोळीच्या टबमध्ये बुडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

By PCB Author

June 27, 2019

विरार, दि. २७ (पीसीबी) – आंघोळीच्या टबमध्ये बुडून एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी विरारमधील नित्यानंद अपार्टमेंटमध्ये घडली.

अवनी सोनावणे असे मृत मुलीचे नाव आहे. विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

विरार पूर्वेला चंदनसार येथे नित्यानंद अपार्ट्मेंटमधील दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये सोनावणे कुटुंब राहते. अवनी टबमध्ये बुडाली त्यावेळी आई जयश्री घराबाहेर होती तर वडिल भारत कामावर होते. जयश्री इमारतीच्या खाली असलेल्या कचरा कुंडीत कचरा टाकून घरी आल्या तेव्हा अवनीचे डोके टबमध्ये बुडालेले होते. जयश्री यांनी लगेच अवनील उचलले व जवळच्या रुग्णालयात घेऊन गेल्या. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर अवनीला मृत घोषित केले.