Maharashtra

अॅव्हेंजर्स एन्डगेमची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; ३०० कोटींचा गल्ला जमवला

By PCB Author

May 06, 2019

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – सिनेरसिकांना वेड लावणाऱ्या ‘अॅव्हेंजर्सः एन्डगेम’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच आहे. पहिल्या आठवड्यात २६० कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यातही १८ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत ५०%पर्यंत वाढ झाली आहे. आत्तापर्यंत चित्रपटांनं २९० कोटींचा गल्ला जमवला आहे. रविवारी हा चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.

‘अॅव्हेंजर्सः एन्डगेम’ या वर्षातला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. २८४५ स्क्रीनवर २६ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अॅव्हेंजर्सप्रेमी बॉलिवूडचा ‘एन्डगेम’ असल्याचं मत व्यक्त करत आहेत.

अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ही या चित्रपटानं सगळे रेकॉर्ड मोडले होते. प्रदर्शनापूर्वीचं चित्रपटाची १० लाखांहून अधिक तिकीटं विकले गेले होते. तर, या चित्रपटाचे एक तिकीट २,४०० रुपयाला विकले जात होते आणि तरीही जवळपास सगळे शोज हाउसफुल झाले होते.