अॅमेझोन वरून मागवलेला मोबईल ग्राहकाला न देता स्वतःकडे ठेऊन फसवणूक; डिलिव्हरी बॉयला अटक

0
256

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) – ग्राहकाने अॅमेझोन या शॉपिंग साईटवरून मोबईल फोन मागवला. मात्र डिलिव्हरी बॉयने मोबईल फोन ग्राहकाला न देता तो स्वतःकडेच ठेऊन ग्राहकाची फसवणूक केली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. ही घटना 28 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

मनोज राजू सूर्यवंशी (वय 19, रा. मुकाईनगर, हिंजवडी. मूळ रा. पाडळी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत राशी श्रीवास्तव राजकुमार श्रीवास्तव (वय 27, रा. नारायणनगर, साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी सोमवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीवास्तव यांनी अॅमेझोन या शॉपिंग साईटवरून मोबईल फोन मागवला होता. मोबईल फोन 28 सप्टेंबर पर्यंत श्रीवास्तव यांना मिळणार असल्याचे ऑर्डरमध्ये सांगण्यात आले. मात्र, 30 सप्टेंबर पर्यंत मोबईल श्रीवास्तव यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मोबईल फोन परत पाठवला.

मोबईल फोन परत पाठवत असताना त्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्याने श्रीवास्तव यांनी मोबईल फोनच्या ट्रॅकिंग आयडी वरून पाहणी केली. त्यामध्ये श्रीवास्तव यांचा मोबईल फोन हिंजवडी येथील अॅमेझोनचे डिलिव्हरी व्हेंडर शरयू मेडिकल येथे काम करणा-या डिलिव्हरी बॉय मनोज याने चोरून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी मनोजला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.