अॅट्रॉसिटीसारखी तत्परता मराठा आरक्षणासाठी का नाही? – उदयनराजे भोसले

0
687

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटीसंदर्भात जो निर्णय दिला होता तो कायद्याद्वारे रद्दबातल करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली. तीच तत्परता केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी का नाही दाखवली, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी वेळीच पावले उचलली असती तर आज लोकांना जिव गमवावा लागला नसता, असे त्यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनाराजे भोसले यांनी पुण्यात शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी निघणारे मोर्चे थांबले पाहिजे, असे सांगितले जाते. पण जर वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळच नसती आली, असे ते म्हणाले.