Notifications

अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या २१ दलितांना फोडून काढले; आयपीएस महिला अधिकाऱ्याचे बेताल वक्तव्य

By PCB Author

December 03, 2018

बीड, दि. ३ (पीसीबी) – तुम्ही मराठा आहात म्हणून मी केवळ तुमच्या पाठीवर मारते. दर दलित असता तर मी त्यांना फोडून काढले असते. एका प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या २१ दलितांना मी फोडून काढले आहे. अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी जे येतात त्यांना मी जास्त मारते, असे धक्कादायक वक्तव्य माजलगावच्या एका आयपीएस महिला अधिकाऱ्याने केले आहे. या बेताल वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे.