अहो पोलिसदादा, या वाहनचोरांना आवरा हो…

0
174

– चाकण, पिंपरी मधून तीन दुचाकी, चिखलीतून टेम्पो चोरीला

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी, पिंपरी मधून एक दुचाकी आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक टेम्पो चोरीला गेला आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 17) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नितीन धर्मदास सोनी (वय 27, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनी यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.

मोहन शिवाजी पाटील (वय 39, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पाटील यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.

प्रशांत नागरा देवाडिगा (वय 42, रा. नालबंद चाळ, चिंचवड स्टेशन, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 12 हजार रुपये किमतीची दुचाकी टाटा कंपनीच्या चासी आउट गेट जवळून चोरीला गेली. ही घटना 13 जानेवारी रोजी सकाळी दहा ते रात्री अकरा वाजताच्या कालावधीत घडली.

युवराज त्रंबक गोरे (वय 43, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गोरे यांचा साडेतीन लाख रुपये किमतीचा टेम्पो अज्ञात चोरट्यांनी गोरे यांच्या घराजवळून चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 17) पहाटे साडेचार वाजता उघडकीस आली.

तळवडे येथे वाहनाच्या पार्टची चोरी

तळवडे येथील तिडीके इंजिनिअरिंग कंपनीच्या गेट समोरून एका इको गाडीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 13 जानेवारी रोजी पहाटे तीन ते 14 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी महेश सोनू मते (वय 32, रा. नेवाळे वस्ती जवळ, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.