Desh

अहमदाबाद मध्ये निमलष्करी दल तैनात; १५ मे पर्यंत भाजीपाला – किराणा विक्री सुद्धा बंद

By PCB Author

May 07, 2020

प्रतिनिधी,दि.७ (पीसीबी) : देशभरात कोरना बाधितांच्या संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण असून त्या पाठोपाठ गुजरात मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. काल दिवसभरात गुजरातमध्ये ३८२ कोरोना पाॅझिटीव रुग्ण आढळून आले व त्यापैकी एकट्या अहमदाबाद मध्ये २९१ रुग्ण असल्याचे समोर आले. अहमदाबाद मध्ये वाढत असलेल्या कोरोन संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून अत्यंत कडक पावले उचलण्यात आली आहे. १५ मे पर्यंत अहमदाबाद बंद पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला . तसेच अहमदाबाद येथे केंद्र शासनाकडून निमलष्करी दलाच्या सात तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) च्या चार तुकड्या व रॅपिड अक्शन फोर्स (आरएफ) ची एक तुकडी कनटेनमेंट झोन येथे तैनात करण्यात येणार आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकाची वाढ गुजरात राज्यात होत आहे. काल पर्यंत गुजरात मध्ये ६६४५ इतके कोरोना पाॅझिटीव रुग्ण नोंदविले गेले आहेत. एकट्या अहमदाबाद मध्ये तब्बल ४४२५ इतके रुग्ण आहेत. अहमदाबादमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ आयएएस अधिकारी राजीव कुमार गुप्ता यांना संपूर्ण अहमदाबादची जबाबदारी दिली आहे. तसेच अहमदाबादचे मनपा आयुक्त विजय मेहरा हे कोरोना पाॅझिटीव रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना १४ कवारटाईन करण्यात आले आहे. ज्येष्ठ आयएएस अधिकारी मुकेश कुमार यांना अहमदाबाद मनपा आयुक्तपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय अहमदाबाद महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतला आहे. दि. ७ मे पासून १५ मे पर्यंत अहमदाबाद शहरात भाजी पाला, किराणा विक्री सहित सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. केवळ दुध विक्री व औषध विक्रीच्या दुकाने उघडी राहणार आहेत.

लॉकडाऊनची अंमलबजावणी कसोशीने करण्यासाठी केंद्र शासनाकडून निमलष्करी दलाच्या सात तुकड्या अहमदाबादला पाठविण्यात आल्या आहेत. त्यासोबत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) च्या चार तुकड्या व रॅपिड अक्शन फोर्स (आरएफ) ची एक तुकडी कनटेनमेंट झोन येथे तैनात करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात मध्ये १० हजार रुग्ण कमी आहेत. मुंबईत अहमदाबादच्या दुप्पट पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. मात्र असे असतानाही महाराष्ट्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी शिथिल केली जात आहे. तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी दारू खरेदीसाठी होणाऱ्या तुफान गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिकच बळावला आहे.