Lifestyle

अस्थमा पेशंट्सना ‘या’ सवयी असायलाच हव्यात…ज्यामुळे अस्थमा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरणार नाही

By PCB Author

January 20, 2021

अस्थमा पेशंटसाठी कोणताही ऋतू तसा मनस्तापाचाच असतो. कारण कधी थंडी ,पावसाळ्यात तर कधी हवेमध्ये होणाऱ्या बदलामुळे ढगाळ हवामानामुळे देखील अस्थमा पेशंटला त्रास होतो. आता तर ऋतुमान बदलल्या सारखीच परिस्थिती आहे. उन्हाळ्यातही प्रचंड वादळी पाऊस येतो आकाश १ ते २ दिवस ढगाळ असतं, हवेमध्ये गारवा जाणवतो आणि या सगळ्याचा त्रास अस्थमा पेशंटला होतो.

पण होणाऱ्या त्रासापासून लांब राहण्यासाठी काही सवयी लावून घेतल्या तर अस्थमा तितका त्रासदायक होणार नाही. अस्थमावर आजपर्यंत तरी कोणताही रामबाण इलाज नाही. हा मुख्यतः आपल्या फुफ्फुसांशी निगडीत आजार आहे. श्वास घ्यायला यामध्ये त्रास होतो आणि शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो.

१. अस्थमा अटॅक ची एक डायरी मेंटेन करा :    अस्थमा अटॅक यायच्या वेळेस कोणती लक्षणे दिसतात याची एका डायरीमध्ये नोंद ठेवा. म्हणजे खोकला येणे,     खोकल्याची ढास लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागल्यासारखे वाटणे अशा गोष्टी होत असतील तर       त्याची नोंद ठेवा. म्हणजे पुढे काळजी घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अशा नोंदी ठेवल्याने लक्षात येईल की     प्रदूषण, धूम्रपान, एलर्जी आणि फ्ल्यू व्हायरस इत्यादी पैकी कोणती कॉमन गोष्ट अटॅक येण्यासाठी कारणीभूत     आहे.

२. एलर्जी असणाऱ्या गोष्टी शक्यतो टाळा. कधीकधी अलर्जेटिक गोष्टींच्या जवळ गेल्यामुळे देखील अस्थमाचा       अटॅक येऊ शकतो.    उदाहरणार्थ;- धूळ, उदबत्ती धूप इत्यादीचा धूर, अगदी फुलांची सुद्धा एलर्जी माणसाला असू शकते, आणि         त्यामुळे अस्थमाचा त्रास होऊ शकतो. कबूतर किंवा कुत्रा मांजरसरखे पाळीव प्राणी तुमच्या आसपास असतील     तर त्याचाही त्रास अस्थमॅटिक लोकांना जास्त होतो. त्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

३. तुमचे बेडशीट पिलो कव्हर्स नियमितपणे बदलले पाहिजेत. त्यांच्यातील छोटे छोटे धुळीचे कण देखील               निघावेत म्हणून ते गरम पाण्यात भिजवून नंतरच धुऊन घ्यावेत.

४. तुमच्या रूम मधील धूळ घालवण्यासाठी रूम स्वच्छ झाडून पुसून घेतलेली असावी. त्यातील हवा शुद्ध असावी.     यासाठी एअर पुरिफायरचा वापर करावा.

५. खाण्याच्या सवयी ज्या गोष्टींचा पथ्य डॉक्टरांनी सांगितलं आहे ते नियमितपणे पाळले गेले पाहिजे जास्त         तेलकट-तुपकट गोष्टी टाळल्या पाहिजेत  आणि सकस आहार घेण्यावर भर दिला पाहिजे.

६. धूम्रपानाची ठिकाणे टाळा. कारण त्यामुळे अस्थमा असणाऱ्या पेशंटने धूम्रपान तर करूच नये शिवाय जिकडे        धूम्रपान होतं अशी ठिकाणं देखील टाळली पाहिजेत. काही काही हॉटेल्स, कॉफी शॉप यामध्ये धूम्रपान होतं ती      ठिकाणं टाळली पाहिजेत. घरातल्या कोणत्याही व्यक्तीला धूम्रपान करू देऊ नये. कार मध्ये देखील कोणाला        धूम्रपान करू देऊ नये.

७. अशा रुग्णानासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. तसाही सगळ्यांनीच व्यायाम करणे गरजेचे         असते. तरी त्यातही अस्थमा पेशंटने नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. जेणेकरून फुप्फुस मोकळी           होतील आणि स्वच्छ हवा शरीरात जाईल.

८. शारीरिक व्यायामाबरोबरच पोहण्याचा व्यायाम देखील अस्थमा पेशंटला उपयुक्त ठरतो.  परंतु व्यायाम             करताना  दम लागत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यासंबंधी डॉक्टरांना आणि तज्ञांना           विचारणा करून व्यायाम करणे योग्य ठरेल. त्याशिवाय नियमितपणे प्राणायाम करण्याने देखील श्वासावर         नियंत्रण ठेवता येतं. या गोष्टी नियमितपणे अस्थमा पेशंटने केल्याच पाहिजेत.

९. अस्थमा रुग्णांसाठी डॉक्टरांकडे नियमित जाणे त्यांनी सांगितलेली औषधे देखील वेळेवर घेणे हे देखील             तितकाच महत्त्वाचे आहे.

१०. बाहेर जायच्या आधी आपली औषधे वेळेवर घेतलेली असली पाहिजेत. त्याशिवाय औषध स्वतः जवळ              बाळगणे देखील योग्य ठरते. स्कार्फ बांधणे स्वतःलाच बंधनकारक करणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे              बाहेरील धुळीबरोबरच बाहेरची थंड हवा देखील नाकाद्वारे शरीरात जाणार नाही.

या सर्व गोष्टी जरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाळल्या तरी थोड्याबहोत प्रमाणात तरी आपण अस्थमाच्या त्रासापासून लांब राहू शकतो.