असा पती कोणाला न मिळो. सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट करणा-या नराधम पती विरोधात अखेर गुन्हा दाखल

0
434

सांगवी, दि.7 (पीसीबी) : पत्नीचे अर्धनग्न फोटो पतीने सोशल मीडियावर पोस्ट केले. याबाबत पतीच्या विरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीने याबाबत बुधवारी (दि. 6) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 37 वर्षीय पतीच्या वीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी असून त्यांनी हनिमूनच्या वेळी काढलेले अर्धनग्न फोटो पतीने पत्नीची संमती न घेता फेसबुक या सोशल मीडियावर अपलोड करून तिचा विनयभंग केला. संबंधित फेसबुक अकाउंटचा पासवर्ड पत्नीला माहिती असल्यामुळे पतीने तो बदलला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.