Pimpri

अश्लील फोटो सासरच्या लोकांना दाखवण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By PCB Author

March 31, 2022

आळंदी, दि. ३१ (पीसीबी) – महिलेचे अश्लील फोटो तिच्या सासरच्यांना दाखवण्याची धमकी देत एका व्यक्तीने महिलेवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर महिलेचे अश्लील फोटो तिच्या पतीला दाखवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 एप्रिल 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालवधीत आळंदी येथे घडली.

गजानन गणेश गादेकर (रा. श्री जलाराम गोशाळा, आळंदी. मूळ रा. आकोली, ता. गंगाखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो तिच्या सासरच्यांना दाखवण्याची धमकी दिली. धमकी दाखवून आरोपीने महिलेवर जबरदस्तीने सतत शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी महिलेचे नग्न फोटो तिच्या पतीला मोबाईलवर पाठवून तिची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आळंदी पोलीस तपास करीत आहेत