अश्लील फोटो बाळगणे गुन्हा नाही- केरळ उच्च न्यायालय

0
352

केरळ, दि. १० (पीसीबी) – पुरुषाने स्वतःजवळ अश्लील फोटो बाळगणे हा स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात एका महिलेने दाखल केलेली याचिका फेटाळत न्यायालयाने हा निर्णय दिला. याचीकेत अश्लील फोटो बाळगणे आणि ते विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे महिलेने म्हटले होते.

यावर न्यायमूर्ती विजय राघवन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर एखाद्या तरुणाकडे अश्लील फोटो असल्यास लागलीच त्याला १९६८ मधील कलम ६० लागू होत नाही. जर त्याने त्या फोटोंचा इतर कोणत्याही उद्देशासाठी किंवा जाहिरातीसाठी दुरुपयोग केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. २००८ मध्ये या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर तो निकाल राखून ठेवण्यात आला होता.