अश्लील ट्रोल्स प्रकरणी केतकी चितळे घेणार राज ठाकरेंची भेट

0
903

मुंबई, दि,२१ (पीसीबी) – अभिनेत्री केतकी चितळे अश्लील ट्रोल्स प्रकरणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. सोशल मीडियावरच्या नेटकऱ्यांनी हिंदी भाषेत बोलण्याने चांगलीच केतकी चितळेला ट्रोल केले.  अश्लील भाषेत करण्यात आलेल्या ट्रोलिंगला केतकी चितळेने जशास तसे उत्तर दिले होते. यानंतर या प्रकरणी आज केतकी मनसे अध्यक्ष यांची भेट घेणार आहे, तर याआधी मुंख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.  

आता आज याच प्रकरणी केतकी चितळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी केतकी चितळे त्यांना भेटणार आहे आणि सगळे प्रकरण सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. आता राज ठाकरे केतकी चितळेला काय आश्वासन देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांच्या शिष्टमंडळास तिने मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली. अश्लील भाषेत करण्याच आलेल्या ट्रोलींगचे गांभीर्य तिने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान आता या सगळ्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे राज ठाकरेंची भेट घेणार आहे.