अश्लील चित्रपटनिर्मिती प्रकरणी राज कुंद्रा विरोधात ‘मोठा’ पुरावा हाती; घरात सापडलं ‘ते’ गुप्त कपाट आणि…

0
455

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलैला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटकेपूर्वीच कुंद्रांची चौकशी केली होती. तर त्यानंतर शिल्पा शेट्टीचीही चौकशी पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी राज कुंद्रांसह शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्या घरावर छापाही टाकला. पोलिसांनी घराची त्याबरोबर कार्यालयाची झाडाझडती घेतली. यातून नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी घराची आणि कार्यालयाची पाहणी केली. पुरावे शोधण्यासंदर्भात घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना घरात एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली आहे. २३ जुलै रोजी पोलिसांनी राजच्या अंधेरीच्या घरी छापा टाकून, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा चौकशी केली. जबाब नोंदवला. यावेळी घराची झाडाझडती घेण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती जप्त करण्यात आली आहेत. त्यातच घरात काही गुप्त कपाटही आढळून आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्रांच्या घरात पोलिसांना गुप्त कपाट सापडल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. “अश्लील चित्रपट निर्मित प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विआन आणि जे.एल. स्ट्रीम कंपनीच्या कार्यालयात एक लपवलेलं कपाट सापडलं आहे. तसंच शिल्पा शेट्टीच्या जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने ई-टाइम्सनं वृत्त दिलं आहे. ज्यात “शिल्पा सध्या कोणत्याच गोष्टीवर बोलणार नाही. या प्रकरणाची सगळ्यांना अर्धवट माहिती आहे. कृपया करून पूर्ण माहिती काढल्याशिवाय बोलू नका. आधी खात्री करून घ्या आणि नंतरच विश्वास ठेवा”, असं त्या व्यक्तीनं म्हटल्याचं सांगितलं आहे.

मुंबई न्यायालयाने शुक्रवारी राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा ऑनलाइन बेटिंगमध्ये वापरण्यात आल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती.