Bhosari

अश्लिलतेचा कळस : विदेशी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करुन दिघीतील महिलेला दाखवले गुप्तांग; तरुणास अटक

By PCB Author

December 07, 2018

दिघी, दि. ७ (पीसीबी) – विदेशी नंबरचा वापर करुन एका २० वर्षीय तरुणाने ४० वर्षीय महिलेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर व्हिडिओ कॉल करुन गुप्तांग दाखवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने पिंपरी-चिंचवड सायबर क्राईम सेल आयुक्तालय चिंचवड येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रतिक रमेश गोहील (वय २०, रा. घर क्र.३४, लेन क्र.३, पिंपळेगुरव) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास आरोपी तरुणाने Textnow या अॅपचा वापर करुन +1(315)817-0304 हा विदेशी नंबरसारखा दिसणारा मोबाईल नंबर तयार केला. तसेच या नंबरव्दारे पीडित ४० वर्षीय महिलेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर व्हिडिओ कॉल करुन गुप्तांग दाखवून त्यांचा विनयभंग. यावर पीडितेने हा प्रकार पतीला सांगितला. त्या दोघांनी याप्रकराची तक्रार सायबर क्राईम सेल पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथे केली. सायबर क्राईम सेलने तातडीने तपास चक्रे फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे +1(315)817-0304 हा मोबाईल क्रमांक ट्रेस केला. आणि आरोपी प्रतिक गोहील याला पिंपळे गुरव येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.