Sports

अश्रफ-रिझवानची जिगरबाज भागीदारी

By PCB Author

December 29, 2020

माऊंट मौनगनुई, दि.२९ (पीसीबी) : गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यानंतरही फहीम अश्रफ आणि महंमद रिझवान यांच्या जिगरबाज फलंदाजीने न्यूझीलंडला पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यासाठी झुंजावे लागले.  फहिम अश्रफ आणि महंदम रिझवान यांची शतकी भागीदारी आणि बिगरमोसमी पावसाामुळे पाकिस्तानचा डाव झटपट गुंडाळण्याच्या न्यूझीलंडच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. पहिल्या दोन सत्रात न्यूझीलंडने पाकिस्कानता डाव ५ बाद ५२ असा अडचणीत आणला होता. दिवस अखेरीस पाकिस्तानचा डाव आटोपला तेव्हा त्यांच्या २३९ धावा झाल्या होत्या.

रिझवान आणि अश्रफ यांनी सातव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. मिशेल सॅंटनेरच्या थेट फेकीने रिझवान ७१ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर जेमिसनने अश्रफला बाद करून पाकिस्तानच्या लांबलेल्या डावाला पूर्णविराम दिला. अश्रफने कारकिर्दीतली सर्वोत्तम ९१ धावांची खेळी केली.  त्यापूर्वीस सकाळी १ बाद ३० वरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर पाकिस्तानचे फलंदाज सकाळच्या सत्रात बोल्ट, साऊदीचा सामना करू शकले नाहीत. बोल्ट, साऊदीचा भेदक मारा खेळताना अझर अली आणि हॅरिस सोहेल या पाकिस्तानी फलंदाजांनी बचावावरच अधिक भर दिला. दोघांनी एकित्रत ५० चेंडूंचा सामना केला, पण त्यांना केवळ नऊच धावा करता आल्या. त्यानंतर साऊदीच्या एकाच षटकात दोघे बाद झाले.  न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने ३, तर बोल्ट, वॅगनर, साऊदी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.