अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष, तर सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री ?

0
489

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते अशोक गेहलोत यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजधानीच्या  राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  

विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यासाठी अशोक गेहलोत यांना तयार रहाण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितले आहे.  अशोक गेहलोत   काँग्रेस अध्यक्ष  झाल्यास त्यांच्या मदतीला दोन-तीन नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष  केले जाणार का? याबाबत काही  स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  अध्यक्ष पद सोडण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. राहुल गांधी यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, माझ्या जागी प्रियांका गांधी यांचे नाव पुढे केले जाऊ नये.  दरम्यान, गेहलोत   सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.  तसेच त्यांचे काँग्रेसच्या इतर नेत्यांबरोबर चांगले सख्य आहेत.  यामुळेच  त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.