अशोकराव चव्हाण यांनी मला अक्कल शिकवू नये – रावसाहेब दानवे

0
1378

जालना, दि. १७ (पीसीबी) – राफेल  आणि आदर्श  हे दोन्हीही  घोटाळे मला समजतात.  या घोटाळ्यावर जाहीरपणे चर्चा करण्यास  मी केव्हाही तयार आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मला अक्कल शिकवू नये, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी निशाणा साधला.  

राफेल करार हा दानवे यांच्या डोक्याबाहेरचा विषय  आहे, अशी टीका  चव्हाण यांनी केली होती.  या टीकेला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दानवे म्हणाले की,  राफेल करार हा काँग्रेसच्या काळात झाला आहे. त्यामुळे तुम्हाला रायफल वाटत असावे. भाजपने राफेल करारात काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा तिळपापड झाला आहे, असेही दानवे म्हणाले.

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यात  मराठवाड्यातील काही चेहऱ्यांची वर्णी लावण्यात  येणार आहे. तर काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.